Saturday, 20 June 2020

एक जमानेमे..

एक जमानेमे हम भी उसके आशिक हुवा करते थे
हमारे निंदोके रास्ते भी उसके ख्वाबोंसे होकर गुजरते थे
पता नही ऐसे क्यू होता था,
मगर निंद से पेहेले दो तीन खंटे, मे इसीमे जाया कर देता था
उसके बाद जाकर निंद लगी तो लगी,
नहीतो सुभे तक यही सिलसिले जारी होते थे...
एक जमानेमे हम भी उसके आशिक हुवा करते थे...

उसका वो अपने हातोसे, अपनी जुलफोंको टेहेलाना
उसके उस सफेद दुपट्टेका हवा मे लेहेराना
उसका शर्मांना , उसका घबराना
मुडके देखना और फिर देखके अनदेखा कर जाना
उसके इन अदाओंको हम हर दिन ताका करते थे...
एक जमानेमे हम भी उसके आशिक हुवा करते थे...

उसके मौजूदगिका ऐहेसास भी कूच अलगसाही लगता था
ख्वाबोंमेभी उसको देखनेको मुझे डरसाही लगता था
जब गुजरतीथी बगलसे तो एक आंधी सी लगती थी
धडकने तेज हो जाती थी और सांस जानबुजकर लेनी पडती थी
वो गुजर जाने के बाद भी हम कुच पल सदमे मे रेहेते थे...
एक जमानेमे हम भी उसके आशिक हुवा करते थे...

आज भी बारीश उसकी यादे लेके आती है
बुंदोंसे , हवाओंसे वो हमको छु जाती है
पुरानी यादे हम फिरसे जी लेते है
बारीश की खुशबू जी भर के पी लेते है
फिर हंस देते है खुदसेही , जैसे पेहेले हसा करते थे
एक जमानेमे हम भी उसके आशिक हुवा करते थे
हमारे निंदोके रास्ते भी उसके ख्वाबोसे होकर गुजरते थे

                                                      -तुषार


सडक

हा ये वही सडक है,
जिसपर मे अकसर घुमता रेहेत हूं,
बिना वजह अकेले...

शायद इसका एक नशा सा हो गया है मुझे,
की तकलीफ होगि ये जानते हुवे भी,
ये पैर मुझे इसी सडक पे ले आते है...

क्यूकी इसी सडक पे,
वो आखों के कोनोसे मुझे देखती थी,
ताकी में ना देख सकू

इसी सडक पे,
वो छूठे वाले गुस्से से मुझे देखती थी,
क्योकी मेरे दोस्त उसे चिडते थे 

और हा ..इसी सडक पे,
उसने पेहेली बार मुझे मुस्कुराकर देखा था
हा इसी सडक पे

हा इसी सडक पे,
मे और मेरे दोस्त उसका पिछा करते थे
कभी वो पिछे देखती थी , तो कभी नही

सडक के एक मोड पे ,
वो मुडके अपने घरकी तरफ निकल जाती थी
मगर मैने उस मोड के आगे 
कभी उसका पिछा किया नही

मे डरता था की उसके मोहोल्ले वाले मुझे देखेंगे तो नही
मगर अब लगता है , की उस मोड के भी आगे,
पिछा करना चाहीये था तेरा
पिछेसेही भला देख तो पाता
तेरी लेहेराते हुवे झुल्फोंको कुछ देर और...

हा ये वही सडक है,
जिसपर मे अकसर घुमता रेहेत हूं,
बिना वजह अकेले...
                                  -तुषार

Wednesday, 17 June 2020

समज

बुद्धीला समजत, तर हृदयाला कळत...
तू मला समजून घेतलस हे तर खर,
पण तुला मी कळलो कधीच नाही...
                                          -तुषार

प्रपोज

फक्त होकार दे,
बाकी काही नको,
फक्त नाही नको....

इकडची तिकडची चर्चा करताना,
घालेन मी जेव्हा विषयाला हात
हळूच गडबडत बोलेन मी,
देशील का मला साथ
माझी ती गडबड पाहून तू हसशील
तशीच हसत रहा, बाकी काही नको...
फक्त नाही नको...

मध्येच करता मी तुझ्या डोळ्यांची स्तुती,
काय सांगू काय तू लाजली होती
तू नेहेमी तशीच लाजत रहा, बाकी काही नको..
फक्त नाही नको...

हळूच होईल नजरानजर,
तुझ्या नजरेतील जादू दाखवेल असर
तू तुझ्या त्या नजरेने,
मला तशीच मारत रहा, बाकी काही नको...
फक्त नाही नको...

निघताना म्हणशील सांगेन विचार करून,
जरा दूर जाता बघशील मागे वळून
तू नेहमी तशीच मागे वळत रहा, बाकी काही नको...
फक्त नाही नको...

फक्त होकार दे,
बाकी काही नको,
फक्त नाही नको....
                         -तुषार

तू नसताना

तू नसताना तू असल्याचा भास होतो
काय सांगू केवढा त्रास होतो
तू नसताना तू असल्याचा भास होतो

पाहतो जेव्हा तुला मी
विसरतो मी मलाही
श्वासश्वासात कल्लोळ होतो
तू नसताना तू असल्याचा भास होतो

डोळे तुझे मृगनयनी 
आहेत खरे की खोटे
कधी कधी संशय येतो
पण तू पापणि मिटताच
ते खरे असल्याचा विश्वास होतो 
तू नसताना तू असल्याचा भास होतो

तुझी ती नखरेल अदा 
पहावीशी वाटे सदा
तेव्हा तुझी ती अदा बघताना
मी घायाळ होतो
तू नसताना तू असल्याचा भास होतो

मी म्हणालो काल तू मला दिसली होतीस
तू म्हणालीस अरे हाक तरी मारायची होतीस
आता तुला कोण सांगणार हाक मारायला सुद्धा भान लागते
आता तुला कोण सांगणार तुला पहायची सुद्धा मला तहान लागते
तू गेल्यावर मी भानावर येतो
तू नसताना तू असल्याचा भास होतो 
काय सांगू केवढा त्रास होतो
तू नसताना तू असल्याचा भास होतो

                                       -तुषार

शायर

जसबातोंको अल्फाजोंमे लिपटना,
ये भी एक अलग मजा है...
शायर हूं दोस्त,
ये भी क्या कम सजा है...
                              -तुषार

लमहें

कल की बात हम कल करेंगे,
आज के लमहें कल कल बनेंगे
आज के पलोंको,
 तू जिना सिख ले मेरे दोस्त
क्या पता कल फिर,
 ये मिलेंगे या ना मिलेंगे....
                                 - तुषार

नशा

सचकी थी ना मुझे खबर,
अबतक तो शायद मे ख़्वाबोंमे था..
कलतक तो में इस शराब मे नशा धुंडता रहा
असली नशा तो उसके आखोमे था....

                                                -तुषार

तफावत

आयुष्याच्या प्रवासात,
तू माझा विचार फक्त दोन स्टेशनांपुरता केलास
आणि मी मात्र संपूर्ण प्रवासात,
फक्त तुझाच विचार करत राहिलो...

तू फक्त उघड्या डोळ्यांनी मला पाहत राहीलीस,
मी मात्र डोळे बंद करुनही फक्त तुलाच बघत राहिलो...

मी जसा आहे तुला तो नेहेमी मी तसाच दिसत राहिलो,
मला मात्र तू तुझ्यापेक्षाही तू सुंदर दिसत राहीलीस...

तू तुझ्या जगात मला कुठेतरी शोधत राहीलीस,
मी मात्र माझं जगच तुझ्यात शोधत राहिलो...

आयुष्याच्या प्रवासात,
तू माझा विचार फक्त दोन स्टेशनांपुरता केलास
आणि मी मात्र संपूर्ण प्रवासात,
फक्त तुझाच विचार करत राहिलो...

                                            - तुषार

तू आणि पाऊस

तू पहिला पाऊस, तू हिरव रान
दिसतेस धुक्यावाणी, किती गोरीगोरी पान

तू पावसाच्या धारा, तू पावसातल्या गारा
पावसात वाहणारा तूच गारगार वारा

तू धगाळलेला सूर्य, आणि तूच चंद्राची कोर
पहिल्या पावसात थुईथुई नाचणारा, तू सुंदर मोर

तूच माझा दिवस, आणि तूच माझी रात्र 
तू माझा पाऊस , मी तुझा चातक मात्र

तू हिव्हाळी दुपार, तू उन्हाळी सकाळ
आणि तूच पावसाळी धुंद संध्याकाळ

काळोखात लूकलूकणार काजवाही तू
पावसाआधी ढगात येणारा गारवाही तू

प्रश्न पडतो की,
तुझ्यापेक्षा जास्त तो पाऊस नसेल ना आवडत.
पण नंतर लक्षात येत,
की पाऊस दिसल्यावर तू आठवतेस,
पण तू दिसल्यावर पाऊस कधीच नाही आठवत..
 
                                                     -तुषार
   

उपमा

तुला मी सूर्य सुद्धा म्हणालो असतो,
पण सूर्यात खूपच आग आहे.
तुला मी चंद्र सुद्धा म्हणालो असतो,
पण चंद्रात सुद्धा दाग आहे.

तुला मी अथांग समुद्र सुद्धा म्हणालो असतो,
पण समुद्राच पाणी सुद्धा, असत थोडं खार.
तुला मी छोटस डबकही म्हणालो असतो,
पण डबकही असत खूपच लहान फार.

काटे असतात म्हणून तुला गुलाब म्हणवत नाही,
आणि सुगंध नसतो म्हणून तुला जास्वंदही म्हणवत नाही.

तू वाटतेस मला,
 तू त्या अप्सरा, मेनका, रंभांसारखी दिसत असशील
पण मी त्यांना तरी कुठे बघितलंय,
तू तर त्यांच्या पेक्षाही सुंदर दिसत असशील.

तू वाटतेस मला त्या इंद्रधनुष्यासारखी ,
जो तुझ्याचसारखा कधी कधी दिसतो.
पण तो तरी फक्त पावसाळ्यात दिसतो,
आणि तुझ्या दिसण्याचा काही नेमच नसतो.

अश्या ह्या तुला उपमा देता देता सुंदर कविता झाली,
अश्या हजारो उपमा दिल्या असत्या पण आता नको
आता थांबायची वेळ झाली...
                                                        -तुषार

उमेद

अंधारलेली रात्र सारी, विस्कटलेल्या दिशा ह्या दाही चांदण्या न उरल्या दिशा दाखवाया, अन् कोणाचा आधार नाही... चालत आहे काळासंगे, चालता आता पायही...