अंधारलेली रात्र सारी,
विस्कटलेल्या दिशा ह्या दाही
चांदण्या न उरल्या दिशा दाखवाया,
अन् कोणाचा आधार नाही...
चालत आहे काळासंगे,
चालता आता पायही झिजले
वेळेचीही गती खुंटली,
घड्याळाचे काटेही निजले...
काळा मागून काळ उलटला,
अन् रात्र अधिकच गेहेरी झाली
मोहणारी शांतताही ,
आज माझी वैरी झाली...
ताबा न उरला परिस्थितीवर,
अन् मी असा अगतिक आहे
जितका गडद अंधार तितकीच,
पहाट ही नजदीक आहे...
पुन्हा नव्याने उडण्यासाठी,
किरण सुखाचा शोधतो आहे
बस उद्याच्या आशेवरती,
मी असा धगधगतो आहे...
मी असा धगधगतो आहे.....
- तुषार हडशी