आयुष्याच्या प्रवासात,
तू माझा विचार फक्त दोन स्टेशनांपुरता केलास
आणि मी मात्र संपूर्ण प्रवासात,
फक्त तुझाच विचार करत राहिलो...
तू फक्त उघड्या डोळ्यांनी मला पाहत राहीलीस,
मी मात्र डोळे बंद करुनही फक्त तुलाच बघत राहिलो...
मी जसा आहे तुला तो नेहेमी मी तसाच दिसत राहिलो,
मला मात्र तू तुझ्यापेक्षाही तू सुंदर दिसत राहीलीस...
तू तुझ्या जगात मला कुठेतरी शोधत राहीलीस,
मी मात्र माझं जगच तुझ्यात शोधत राहिलो...
आयुष्याच्या प्रवासात,
तू माझा विचार फक्त दोन स्टेशनांपुरता केलास
आणि मी मात्र संपूर्ण प्रवासात,
फक्त तुझाच विचार करत राहिलो...
- तुषार
No comments:
Post a Comment