फक्त होकार दे,
बाकी काही नको,
फक्त नाही नको....
इकडची तिकडची चर्चा करताना,
घालेन मी जेव्हा विषयाला हात
हळूच गडबडत बोलेन मी,
देशील का मला साथ
माझी ती गडबड पाहून तू हसशील
तशीच हसत रहा, बाकी काही नको...
फक्त नाही नको...
मध्येच करता मी तुझ्या डोळ्यांची स्तुती,
काय सांगू काय तू लाजली होती
तू नेहेमी तशीच लाजत रहा, बाकी काही नको..
फक्त नाही नको...
हळूच होईल नजरानजर,
तुझ्या नजरेतील जादू दाखवेल असर
तू तुझ्या त्या नजरेने,
मला तशीच मारत रहा, बाकी काही नको...
फक्त नाही नको...
निघताना म्हणशील सांगेन विचार करून,
जरा दूर जाता बघशील मागे वळून
तू नेहमी तशीच मागे वळत रहा, बाकी काही नको...
फक्त नाही नको...
फक्त होकार दे,
बाकी काही नको,
फक्त नाही नको....
-तुषार
No comments:
Post a Comment