Wednesday, 17 June 2020

तू आणि पाऊस

तू पहिला पाऊस, तू हिरव रान
दिसतेस धुक्यावाणी, किती गोरीगोरी पान

तू पावसाच्या धारा, तू पावसातल्या गारा
पावसात वाहणारा तूच गारगार वारा

तू धगाळलेला सूर्य, आणि तूच चंद्राची कोर
पहिल्या पावसात थुईथुई नाचणारा, तू सुंदर मोर

तूच माझा दिवस, आणि तूच माझी रात्र 
तू माझा पाऊस , मी तुझा चातक मात्र

तू हिव्हाळी दुपार, तू उन्हाळी सकाळ
आणि तूच पावसाळी धुंद संध्याकाळ

काळोखात लूकलूकणार काजवाही तू
पावसाआधी ढगात येणारा गारवाही तू

प्रश्न पडतो की,
तुझ्यापेक्षा जास्त तो पाऊस नसेल ना आवडत.
पण नंतर लक्षात येत,
की पाऊस दिसल्यावर तू आठवतेस,
पण तू दिसल्यावर पाऊस कधीच नाही आठवत..
 
                                                     -तुषार
   

3 comments:

उमेद

अंधारलेली रात्र सारी, विस्कटलेल्या दिशा ह्या दाही चांदण्या न उरल्या दिशा दाखवाया, अन् कोणाचा आधार नाही... चालत आहे काळासंगे, चालता आता पायही...